By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:27 IST
1 / 7भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठने गुडन्यूज दिली आहे. ती सरोगसीद्वारे आई होणार आहे. 'वी आर प्रेग्नंट'म्हणत तिने पतीसोबत फोटी शेअर केला आहे.2 / 7संभावना वयाच्या ४४ व्या वर्षी नैसर्गिकरित्या आई होणार होती. मात्र तिसऱ्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. या दु:खातून सावरणं तिला कठीण गेलं. 3 / 7तसंच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच गर्भपात झाल्याचा आरोप तिने केला होता. याआधीही संभावना ८ वेळा आयव्हीएफच्या माध्यमातून गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करत होती.4 / 7या संपूर्ण प्रक्रियेत तिला ६५ इंजेक्शन्स घ्यावे लागले. हे सगळं खूप वेदनादायी होतं पण बाळासाठी तिने आनंदाने केलं. जेव्हा तिला वाटलं की इंजेक्शन्स आता बंद होतील तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोकेच थांबले.5 / 7आता बऱ्याच वर्षांनी कपलला गुडन्यूज मिळाली आहे. संभावनाने फोटो शेअर करत लिहिले, 'वी आर प्रेग्नंट. प्रेम, आशा आणि सरोगसीच्या माध्यमातून आमची सर्वात सुंदर गोष्ट बहरत आहे. काउंटडाऊन सुरु.'6 / 7यासोबत त्यांनी चिमुकल्या शूजचे फोटो पोस्ट केले आहेत. पाळीव श्वानाचा आणि बाजूला 'Its official' असं लिहिलेलाही एक फोटो आहे.7 / 7संभावना सेठने २०१६ साली अविनाश द्विवेदीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.