Join us

नारकरांच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का? गर्लफ्रेंडच्या सुंदर फोटोंवर अमेयनेही केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:06 IST

1 / 8
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणजेच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. दोघंही सोशल मीडियावर कमालीचे लोकप्रिय आहेत.
2 / 8
नारकर दाम्पत्याला एक मुलगा आहे ज्याचं नाव अमेय नारकर. अमेय सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे तो टीव्ही विश्वातील एका अभिनेत्रीला तो डेट करत आहे.
3 / 8
नुकताच अमेय भारतात परत आला तेव्हा त्या अभिनेत्रीने विमानतळावर त्याला खास सरप्राईज दिलं. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
4 / 8
ईशाने नुकतेच केशरी साडीत फोटो शेअर केले आहेत. लांब केस, केसात गरजा, साजेसे दागिने यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 'ईश्शsss' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तर त्यावर अमेयने 'इशाsss'अशी कमेंट केली आहे.
5 / 8
ही अभिनेत्री आहे ईशा संजय (Isha Sanjay). झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत ती दिसत आहे. सूर्या दादाच्या चार बहि‍णींपैकी एक राजश्रीची ती भूमिका साकारत आहे.
6 / 8
निसर्गरम्य वातावरणात तिने हे फोटोशूट केलं आहे. बऱ्याच पोज दिल्या आहेत. ऐश्वर्या नारकरांनी तिची पोस्ट लाईक केली आहे
7 / 8
ईशा उत्तम डान्सरही आहे. अमेयसोबतही तिने डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. ते महाविद्यालयीन दिवसापासूनच एकमेकांना ओळखतात.
8 / 8
ईशा आणि अमेय इतके दिवस लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. आता अमेय भारतात आला असून तोही इंडस्ट्रीत काम करणार आहे. याआधी त्याने'खरा इन्स्पेक्टर मागावर' या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरमराठी अभिनेता