1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत.2 / 10हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या लग्नाबद्दल फारसे कुणाला माहित नव्हते. या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळता मित्रपरिवार उपस्थित होता.3 / 10हृता आणि प्रतीकचे १८ मे रोजी दुपारी लग्न पार पडले. त्यानंतर रात्री त्या दोघांनी लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली.4 / 10या दोघांच्या लग्नाच्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्नात या दोघांनी पारंपारिक लुक केला होता. 5 / 10 ह्रता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याशी शुक्रवारी, २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता. यानंतर आज तिने प्रतीकसोबत लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे.6 / 10ह्रता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रतीक शाहसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.7 / 10प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 8 / 10'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन प्रतीकने केले आहे.9 / 10हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.10 / 10हृताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन उडू उडू झाले या मालिकेत काम करते आहे. तसेच ती अनन्या या चित्रपटातही झळकणार आहे.