Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hruta Durgule : कधी को-स्टारच्या प्रेमात पडलीयस का?; हृता दुर्गुळे म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 13:43 IST

1 / 10
अनेक तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (Hruta durgule). उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे हृताने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
'फुलपाखरु' या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हृताने मोठ्या पडद्यापर्यंत उडी मारली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
हृता दुर्गुळेच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. मालिकेनंतर तिने मराठी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'दादा एक गुड न्यूज आहे' सारखे नाटक केल्यानंतर ती 'अनन्या', 'टाइमपास ३', सर्किट' सारख्या चित्रपटात झळकली. मात्र करिअरच्या या शिखरावर असताना हृताने लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
नुकत्याच लोकमत फिल्मी दिलेल्या मुलाखतीत हृताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
मुलाखती दरम्यान हृताला प्रश्न विचारण्यात आलं की, “तू कधी सहकलाकाराच्या प्रेमात पडली आहेस का?” त्यावर हृताने दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
या प्रश्नाच उत्तर देताना हृता म्हणाली, “हो. पण मी त्याचं नाव नाही सांगणार.” ह्रताने प्रेमाची कबुली दिली खरी पण त्या को-स्टारचं नाव गुलदस्त्यात ठेवलं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
२०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्न केले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
हृता आणि प्रतीक सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमाँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
प्रतीक शाह हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :ऋता दूर्गुळे