By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:32 IST
1 / 9आजकाल अनेक महिला लहानपणी घडलेल्या घटनांवर मोकळेपणाने बोलतात. ओळखीच्याच माणसांकडून करण्यात आलेल्या गैरवर्तनाबद्दल सांगतात.2 / 9नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने तिच्या लहानपणी घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. वडिलांच्याच मित्राची तिच्यावर वाईट नजर होती असा तिने खुलासा केला.3 / 9ही अभिनेत्री एमबीबीएस आहे. नंतर ती मॉडेलिंगमध्ये आली. हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं. नंतर काही वर्षांपूर्वी ती 'स्माईल प्लीज' या मराठी सिनेमात दिसली. तर आता अभिनेत्री फिजिशियन, सायकोलॉजिस्ट आहे. 4 / 9ही अभिनेत्री आहे अदिती गोवित्रीकर. पनवेलमधील मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिने मेडिकलमध्ये शिक्षण घेतलं आणि ती एमबीबीएस झाली.5 / 9नुकतंच हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अदितीने लहानपणी कशा प्रकारे गैरवर्तनाचा सामना केला याचा खुलासा केला. ती म्हणाली, 'सुरक्षेबद्दल बोलायचं तर पनवेलमध्येच मी अनेकदा भयानक प्रसंगांना सामोरी गेले आहे. काही जणांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आणि त्यातून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला. मी मोठी होईपर्यंत याविषयी कोणाशी बोललेही नव्हते.'6 / 9'एक तर माणूस माझ्या वडिलांचाच मित्र होता. त्यांची माझ्यावर वाईट नजर असायची. तर इतर दोन वेळी अनोळखी लोक होते. तेव्हा मी ६-७ वर्षांचीच होते जेव्हा या ३-४ घटना माझ्यासोबत घडल्या.'7 / 9'पण दिल्ली गुडगावच्या तुलनेत इथे खूपच सुरक्षित वातावरण होतं. मी दादरला क्लासेसला जायचे तेव्हा बसमधून प्रवास करायचे. साहजिक बसमध्ये विनयभंगाच्या घटना घडतात. मी माझ्या पुढच्या आणि मागच्या बाजूला मोठी बॅग लटकवायचे. बॅगमुळे मला कव्हर मिळायचं.'8 / 9अदितीने १९९८ साली सर्जन मुफ्फजल लकडावालाशी लग्न केलं. लग्नानंतर २००१ साली अदितीने मिसेल वर्ल्डचा खिताब जिंकला होता. अदितीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २००९ साली अदिती आणि मुफ्फजलचा घटस्फोट झाला. 9 / 9२००१ सालीच लारा दत्ता आणि प्रियंका चोप्राही ब्युटी पेजेंटमध्ये जिंकले होते. त्यांना कार, फ्लॅट मिळाले होते तर अदितीला मात्र एक बुके मिळाला होता असाही तिने मुलाखतीत खुलासा केला.