Join us
Daily Top 2Weekly Top 5

IN PICS : जितकं मोठं नाव, तितका जास्त पैसा..., 'या' 5 स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:23 IST

1 / 5
बाहुबली या सिनेमानंतर साऊथ स्टार प्रभास जगभरात लोकप्रिय झाला. प्रभासचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण यातल्या एका सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचं नाव आहे आदीपुरूष. या सिनेमासाठी प्रभासने 150 कोटी फी घेतल्याचं कळतंय.
2 / 5
थलपती विजय हा साऊथचा महागडा स्टार आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित सिनेमासाठी त्यानं 80 कोटी फी घेतली होती म्हणे. आता त्याचा नवा सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे बिस्ट. या सिनेमासाठी थलपती विजयने 120 कोटी रूपयांत साईन करण्यात आल्याचं कळतंय.
3 / 5
शाहरूख खानला उगाच बॉलिवूडचा किंग म्हणत नाही. लवकरच शाहरूख यशराजच्या ‘पठान’ या सिनेमात दिसणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी शाहरूखने 100 कोटी फी घेतल्याची चर्चा आहे. या आगामी सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे. शिवाय जॉन अब्राहमही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
4 / 5
भाईची बातचं न्यारी. सलमानने साजिद नाडियाडवालाचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा सिनेमा साईन केल्याचं तुम्हाला माहित असेलंच. या सिनेमासाठी सलमानने फीमध्ये कपात केल्याचं म्हटलं जातंय. होय, कोरोना काळातील इंडस्ट्रीची स्थिती बघता या चित्रपटासाठी सलमानने म्हणे त्याच्या फीमध्ये 15 टक्के कपता केली. अर्थात याऊपरही त्याला या चित्रपटाचे सुमारे 125 कोटी मिळणार आहेत.
5 / 5
अल्लू अर्जुन सध्या साऊथचा नंबर वन स्टार बनला आहे. ही कमाल आहे त्याच्या ‘पुष्पा’ या सिनेमाची. अल्लूच्या या सिनेमानं जगभर नुसता धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनने मानधनात वाढ केली आहे. ताज्या चर्चेनुसार, अल्लू अर्जुनने एक नवा सिनेमा साईन केला आहे आणि यासाठी तो 100 कोटी रुपए मानधन घेणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शक एटली दिग्दर्शित करणार असून लायका प्रॉडक्शन याचा निर्माताआहे. अद्याप या सिनेमाची घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहे.
टॅग्स :अल्लू अर्जुनसलमान खानशाहरुख खानप्रभास