By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:26 IST
1 / 7मराठी कलाकारांनी हिंदीत काम करमं काही नवीन नाही. अगदी गिरीश महाजनी, रमेश देव यांच्यापासून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ते आता प्रिया बापट, जितेंद्र जोशी असे अनेक कलाकार हिंदीत डंका गाजवत आहेत.2 / 7मराठी कलाकरांचं हिंदीत कायम कौतुकच होतं. त्यांचा प्रामाणिकपणा, वेळेचं पालन आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे ते नाव उंचावतातच. सई ताम्हणकर तर सध्याचं ताजं उदाहरण आहे.3 / 7अशीच एक अभिनेत्री सध्या आमिर खान निर्मित एका सिनेमात झळकत आहे. स्वत: आमिर खानने तिची ऑडिशन पाहून तिचं कौतुक केलं आहे. कोण आहे ती?4 / 7आमिर खान निर्मित 'हॅपी पटेल' सिनेमा आला आहे. यामध्ये कॉमडियन वीर दास मुख्य भूमिकेत आहे. तर त्याची अभिनेत्री आहे मराठमोळी मिथिला पालकर.5 / 7नुकतीच तिने 'द स्क्रीन'ला मुलाखत दिली. ती म्हणाली, 'या सिनेमासाठी मला ऑडिशन अशी द्यावी लागली नाही. माझं काम त्यांना माहित होतं. थेट दिग्दर्शकासमोरच झूम कॉलवर आमचं सगळ्यांचं रीडिंग झालं आणि मला भूमिका मिळाली.'6 / 7'आमिर सरांनी नंतर माझं रीडिंग पाहिलं. वीर आणि मेकर्सला तर आवडलं होतं पण आमिर सरांना आवडेल का याची धाकधूक होती. पण त्यांनाही खूप आवडलं. मी त्यांना नंतर भेटले तेव्हा ते म्हणाले,'खूप छान काम केलं आहेस. तुझं स्वागत आहे.'7 / 7मिथिला पालकर यानंतरही आणखी एका हिंदी सिनेमात झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमात तिचीही भूमिका आहे. शिवाय मिथिला साउथ सिनेमांमध्येही सक्रीय असते.