1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीतच रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारली आहे. या भूमिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 2 / 10अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 3 / 10आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इना मीना डिका यासारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. तर आभास हा या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सुरुवातीला सहकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सून लाडकी सासरची या चित्रपटात सासूची भूमिका केली.4 / 10अर्चना पाटकर यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा हे त्यांचे सासर. महेंद्र पाटकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. 5 / 10अर्चना पाटकर यांची सूनदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव त्याला आहे.6 / 10आदित्यने अभिनेत्री हेमलता बाणेसोबत विवाह केला आहे. हेमलता बाणेला लहानपणापासून नृत्याची विशेष आवड असल्याने इयत्ता सातवीत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला. 7 / 10त्यानंतर तिने ४०० हुन अधिक अल्बम मधून काम केले. त्यातील रेतीवाला नवरा पाहिजे या अल्बमला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 8 / 10आम्ही सातपुते, इवलासा खोपा,नवरा माझा भवरा, चल धर पकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्य सावित्री आणि सत्यवान, लावू का लाथ, चिरगुट, साहेब यासारख्या चित्रपटात ती झळकली आहे.9 / 10याशिवाय मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग दर्शवून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.10 / 10 एकेकाळी आघाडीवर असणारी हेमलता आता अभिनय क्षेत्रात फारशी अॅक्टिव्ह नाही. आता तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.