'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 19:39 IST
1 / 7'आई कुठे काय करते'मधील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचा आज वाढदिवस आहे. संजना म्हणजेच रूपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मधुराणीला शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 7रुपालीने इंस्टाग्रामवर दोघींचे फोटो शेअर करत मधुराणीला 'हॅपी बर्थडे' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुझा आजचा दिवस खास असेलच आणि येतं वर्ष तुझ्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो... तुला खूप सारं प्रेम', असं कॅप्शन रूपालीने या फोटोला दिलं आहे.3 / 7मधुराणी गोखले आणि रूपाली भोसले या दोघी 'आई कुठे काय करते' या मालिकेत एकत्र काम करत आहेत. 4 / 7मधुराणी अरूंधतीचं तर रूपाली संजना ही भूमिका साकारते आहे.5 / 7या दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.6 / 7याआधीही रूपालीने या मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर केले होते.7 / 7रुपाली आणि मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील फोटोंना खूप पसंती मिळते आहे.