Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?", 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव

By कोमल खांबे | Updated: June 16, 2025 16:39 IST

1 / 7
'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची भूमिका साकारून दिपाली पानसरेने लोकप्रियता मिळवली.
2 / 7
दिपालीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा प्रसंग शेअर केला.
3 / 7
दिपाली म्हणाली, 'पहिले १२ दिवस सेटवर मी कोणाशीच बोलत नाही. कारण या १२ दिवसांत मला लोक ओळखायचे असतात'.
4 / 7
'हा नियम मी स्वत:ला घालून घेतला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मी कधी अप्रोचेबल वाटले नाही'.
5 / 7
'एकदा फक्त एका सिनेमासाठी दिग्दर्शकाने मला महिला मेकअप आर्टिस्टकडून क्रॉम्प्रोमाइजची विचारणा केली होती. तेव्हा मी त्याला खूप शिव्या दिल्या होत्या'.
6 / 7
'पण, यानंतर कोणीही मला असं काही बोललेलं नाही. रोल दिला तर कॉम्प्रोमाइज करणार का? असं त्याने विचारलं होतं'.
7 / 7
'मी तेव्हा नवीन होते. त्यामुळे हा शब्दच माहीत नव्हता. त्यानंतर मी त्या मेकअप आर्टिस्टला आणि दिग्दर्शकालाही खूप बोलले. मी पहिल्यापासूनच खूप बिनधास्त आहे. मी घाबरत नाही. इंडस्ट्रीत लोक खूप फेक वागतात'.
टॅग्स :टिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका