Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:07 IST

1 / 9
ऐश्वर्या रायसोबत 'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री त्रिशा कृष्णन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तमिळ-तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्या त्रिशाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनय कौशल्य दाखवले आहे. सध्या ता तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.
2 / 9
रिपोर्टनुसार अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी लग्नगाठ बांधणार आहे. ती साऊथमधील एका निर्मात्याच्या प्रेमात असल्याचं बोललं जातं आहे.
3 / 9
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार त्रिशा एका मल्याळम निर्मात्याच्या प्रेमात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रिपोर्टनुसार तृष्णा लवकरच तिच्या लग्नाबाबत मोठी घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अभिनेत्रीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
4 / 9
त्रिशाने तिच्या प्रोफेशन लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे अधिक चर्चेत राहिली. यात तिच्या साखरपुडा मोडण्यापासून ते खासजी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.
5 / 9
त्रिशाचे पहिले अफेअर विजयसोबत होते. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'घिल्ली' चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या नात्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे विजयचे वैवाहिक जीवन धोक्यात आले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.
6 / 9
यानंतर त्रिशाचे नाव बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत जोडले गेले. दोघेही अनेक वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द राणा डग्गुबतीने कॉफी विथ करणमध्ये केला होता.
7 / 9
जेव्हा त्रिशा आणि राणा डग्गुबती रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघांचे इंटिमेट फोटो लीक झाले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.
8 / 9
डिसेंबर 2015 मध्ये,त्रिशाने सर्वाना आश्चर्यचकित केले जेव्हा तिने वरुण मनियान या बिझनेसमनची साखरपुडा झाल्याची घोषणा केली. एंगेजमेंटमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
9 / 9
मात्र, काही महिन्यात दोघांचा साखपुडा मोडला. धनुषमुळे त्रिशाची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे. धनुष एंगेजमेंटला आला तेव्हा धनुष आणि वरुणचे संबंध चांगले नव्हते. जेव्हा वरुणने हे समोर आणले तेव्हा त्रिशाचा संयम सुटला आणि यावरून दोघांमध्ये त्यांच्या एंगेजमेंट पार्टीत वाद झाला होता.
टॅग्स :Tollywoodधनुषराणा दग्गुबतीसेलिब्रिटी