1 / 10 ‘बाहुबली’ प्रभासचे ठाऊक नाही़ पण ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दुग्गबती मात्र लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. राणा दुग्गबती याने काल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेयसीचा फोटो शेअर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. यानंतर राणावर शुभेच्छांचा वर्षाव सुुरू झाला. साऊथ इंडस्ट्री व बॉलिवूड शिवाय चाहते अशा सर्वांनी राणाला शुभेच्छा दिल्यात.2 / 10राणाच्या या ‘दुल्हनिया’चे नाव मिहिका बजाज आहे. मिहिका ही इंटेरिअर डिझायनर असून ‘ड्यू ड्रॉप डिझाईन’ या स्टुडिओ या कंपनीची मालकीण आहे. 3 / 10‘ड्यू ड्रॉप डिझाईन’ ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे.4 / 10मिहिकाने इंटिरियर डिझाईनमध्ये मुंबईमधून डिप्लोमा केला आहे. लंडनच्या चेल्सा युनिव्हर्सिटीतून आर्ट अॅण्ड डिझाईनमध्ये एमए केले आहे. 5 / 10 विशेष म्हणजे मिहिकाची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर आहे.6 / 10या मिहिकाचे बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरसोबतही नाते आहे. होय, सोनम व मिहिका दोघींही खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. सोनम कपूरच्या लग्नात मिहिका हजर होती7 / 10 मिहिका सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 8 / 10मिहीकाला भेटवस्तूंसंदर्भात एका कंपनीची स्थापना करायची आहे. महागड्या भेटवस्तूंची कंपनी स्थापन करण्याची इच्छा तिने एका मुलाखतीत बोलून दाखवली होती.9 / 1010 / 10राणाबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे़ राणा सोशल मीडियाचा सुपरस्टार आहे़ ‘बाहुबली’ या चित्रपटातील भल्लाल देवच्या भूमिकेने राणा दुग्गबतीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.