Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prabha Ratnani's Death: बॉलिवूडचा फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या आईचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 11:59 IST

Prabha Ratnani's Death: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी याची आई प्रभा रत्नानी यांचे गुरुवारी निधन झाले.

ठळक मुद्देदेशविदेशातील बड्या मॅगझिनचा कव्हर फोटोग्राफर म्हणूनही डब्बू ओळखला जातो.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी याची आई प्रभा रत्नानी यांचे गुरुवारी निधन झाले. खुद्द डब्बू रत्नानी याने ही माहिती दिली. आईचा फोटो शेअर करत, रेस्ट इन पीस मॉम, असे ट्वीट त्याने केले. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी डब्बूच्या आईच्या निधनाव दु:ख व्यक्त केले.प्रभा या दीर्घकाळापासून आजारी होत्या. डब्बू हा बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो. त्याच्या कॅलेंडरसाठीही तो प्रसिद्ध आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या अंदाजात तो कॅलेंडर लॉन्च करतो. या कॅलेंडरवर बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींचे फोटो झळकतात. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान, आलिया भट, ऐश्वर्या रास,रणवीर सिंग, करिना कपूर, दीपिका पादुकोण अशा अनेकांचे फोटो डब्बूच्या कलेंडरवर झळकले आहेत.

देशविदेशातील बड्या मॅगझिनचा कव्हर फोटोग्राफर म्हणूनही डब्बू ओळखला जातो. ओम शांती ओम, ब्लॅकमेल, लिजेंड आॅफ भगतसिंग, जीस्म, कहो ना प्यार है, अशा अनेक बॉलिवूड सिनेमांसाठी पब्लिस्टिी पोस्टर्स बनवण्याचे कामही त्याने केले आहे.

टॅग्स :डब्बू रतनानी