Join us
Daily Top 2Weekly Top 5

-अन् रिचर्ड टोरेसने केले चक्क झाडाशी लग्न! कारण ऐकून व्हाल थक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:38 IST

ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण एका लग्नाची रोचक कथा समोर आली आहे. होय, या अभिनेत्याचे नाव आहे, रिचर्ड टोरेस.

ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण एका लग्नाची रोचक कथा समोर आली आहे. होय, जंगलातील वृक्षतोडीमुळे दु:खी असलेल्या अभिनेत्याची ही कथा़ बेसुमार वृक्षतोडीमुळे पेरूचा हा अभिनेता इतका दु:खी होता की, त्याने या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी चक्क झाडाशीचं लग्नगाठ बांधली. होय, या अभिनेत्याचे नाव आहे, रिचर्ड टोरेस.

डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सँटो डोमिंगोमध्ये वृक्षांची बेसुमार कत्तल पाहून रिचर्ड दु:खी होता. ही वृक्षतोड थांबावी, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने एक वेगळीचं शक्कल लढवली आणि झाडासोबत लग्न करण्याचा घाट घातला. सिसुडेड कलोनियलमध्ये हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. रिचर्डने वधूरूपी झाडाला अंगठी घातली. मला या झाडासोबत लग्न मंजूर असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, रिचर्डचे हे अशाप्रकारचे १७ वे लग्न होते.अशा १०० झाडांशी लग्न करण्याचा संकल्प त्याने सोडला आहे.

टॅग्स :सेलिब्रिटी