Join us

या एका कारणामुळे मला आई व्हायचे नव्हते, मुलं नको होती, पुन्हा एकदा आयशा झुल्काने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 20:52 IST

अलीकडे एका मुलाखतीत आयशाने आपल्या या जुन्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. सोबत पर्सनल लाइफबद्दलही काही खुलासे केलेत.

90 च्या दशकात याच आयशाने मोठा पडदा गाजवला होता. आयशाने त्याकाळात अनेक हिट सिनेमात काम केले. जो जिता वही सिकंदर दलाल, खिलाडी, मुकद्दर, मासूम, एक राजा रानी, मीत मेरे मन के असे अनेक सिनेमा तिने केलेत. या सिनेमांनी आयशाला लोकप्रिय अभिनेत्रींच्या रांगेत आणून उभे केले. पण यशाच्या शिखरावर असताना आयशाने अचानक सिनेमांना अलविदा म्हटले.

आज आयशाचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. २००३ मध्ये 'आंच' या सिनेमातही ती दिसली.यानंतर 2018 साली तिने कमबॅक केला. पण तिच्या कमबॅकची फारशी कुणी दखलही घेतली नाही. अलीकडे एका मुलाखतीत आयशाने आपल्या या जुन्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. सोबत पर्सनल लाइफबद्दलही काही खुलासे केलेत.

अनेकदा आयशाला मुलं का नको होती यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. वारंवार आयशा याबद्दल बोलताना दिसते. पुन्हा एकदा आयशाने तिला आई का व्हायचे नव्हते यावर मनमोकळेपणाणे बोलली आहे. याबद्दल तिने सांगितले की,हे खरंय मला मूल नको होते. मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. माझा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला. पतीनेही मला समजून घेतले. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ति आहे. आता माझा बराच वेळ आणि माझी शक्ती मी सोशल कामात घालवते, असे तिने सांगितले.

मात्र करिअरदरम्यान काही सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप तिला आजही होतो. तिने सांगितले, मणिरत्नम यांचा ‘रोजा’ हा सिनेमा बिझी शेड्यूलमुळे मी नाकारला होता. मला आजही त्याची खंत वाटते. रामा नायडूंचा ‘प्रेम कैदी’ हा सिनेमा मी नाकारला. कारण यात मी बिकिनी सीन्स द्यावेत, अशी मेकर्सची इच्छा होती.आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे. पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते.

टॅग्स :आयशा जुल्का