Join us

पवित्र पुनिया डिसेंबरमध्ये एजाज खानसोबत करणार लग्न? अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:54 IST

Pavitra punia all set to tie the knot with eijaz khan by december :बिग बॉसच्या घरात दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले.

बिग बॉसच्या प्रत्येक हंगामात काही नवीन जोड्या तयार होत असतात. या सीझनमध्येही एजाज खान आणि पवित्र पुनिया एकमेकांच्या प्रेमात पडले. घरातून बाहेर आल्यानंतरही दोघांना बर्‍याचदा एकत्र स्पॉट केले जाते. अलीकडेच या दोघांच्या लग्नाच्या बातमीनेही जोर धरला. यावर्षी डिसेंबरपर्यंत दोघे लग्नाच्या बेडीत अडकतील अशी बातमी आहे.  यावर आता पवित्र पुनिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शुक्रवारी एका पापाराझीने पवित्राला तिच्या आणि एजाज खानच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की ,जेव्हा दोघांचे लग्न होईल तेव्हा ते प्रथम त्यांना आमंत्रण पाठवतील. परंतु कार्ड येईपर्यंत त्याच्या लग्नावरील सस्पेन्स ठेवणंच ठीक राहील. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, दोघांनाही लग्न करायचं आहे, पण त्याआधी दोघांनाही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. 

बिग बॉसच्या घरात दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले. काही आठवड्यानंतर पवित्रा घरातून आऊट झाली. त्यानंतर एजाजला पवित्रावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती. एजाज खान हा ‘काव्यांजली’ या टीव्ही शोमुळे नावारूपास आला होता. पुढे ‘तनु वेड्स मनु’ या सिनेमातही तो झळकला. कुछ ना कहो, मीराबाई नॉट आऊट, जिला गाजियाबाद, लकी कबुतर, शोरगुल, अपस्टार्ट या सिनेमातही त्याने भूमिका साकारल्या.

टॅग्स :बिग बॉस १४