Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा, हा तर मराठीच आहे! पार्थ समथान म्हणाला, "मी पुण्याचा, आपलाच माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:28 IST

लोकांना वाटतं की मी युपीचा असेल पण..., पार्थ समथान स्पष्टच बोलला

'कैसी ये यारिया'फेम अभिनेता पार्थ समथान तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहे. मालिकेत त्याची निती टेलरसोबत जोडी होती. दोघांचे रोमँटिक सीन्स खूप व्हायरल झाले. पार्थच्या गुड लूक्सवर मुली तर अक्षरश: फिदा झाल्या. मार्थ नुकताच 'सीआयडी २'मध्येही दिसला होता. दरम्यान पार्थ पुण्याचा आहे आणि उत्तम मराठीही बोलतो हे खूप जणांना माहित आहे. 

झूमला दिलेल्या मुलाखतीत पार्थ म्हणाला, " मी मराठी खूप चांगलं बोलतो. लोकांना माहित नाहीये की मी मराठीच आहे. मी पुण्याचाच आहे. खूप लोकांना असं वाटतं की मी उत्तर भारतीय आहे. पण मी मराठी आहे. लोकांना हे कळणं खूप गरजेचं आहे. मी तुमचाच आहे आणि आपला माणूस आहे. मराठी माणूस आहे."

सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा हा मुद्दा चर्चेत आहे. मराठी भाषा जगली पाहिजे म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यातच एका हिंदी अभिनेत्याला अशा प्रकारे उत्तम मराठी बोलताना पाहून चाहतेही सुखावले आहेत. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पार्थचं कौतुकही केलं आहे. 

पार्थ सध्या कलर्सवरील  'सेहर होने को है' मालिकेत दिसत आहे. त्याने 'कैसी ये यारिया' शिवाय 'कसौटी जिंदगी की २','मनन' बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर, गुमराह' या मालिकांमध्येही काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Parth Samthaan: 'I am from Pune, a Marathi Manoos!'

Web Summary : Parth Samthaan, famed for 'Kaisi Yeh Yaariaan', revealed his Marathi roots. In an interview, he emphasized his Pune connection and fluency in Marathi, surprising many fans who assumed he was North Indian. He currently stars in 'Seher Hone Ko Hai'.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी