Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्ण पेठे-सुमित पाटीलची केमिस्ट्री! 'विषय हार्ड' मधलं 'येडं हे मन माझं' रोमँटिक गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:00 IST

सुमित पाटील आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विषय हार्ड' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सध्या मराठी सिनेमांची चलती आहे. एकापेक्षा एक मराठी चित्रपट थिएटरगृहात धुमाकूळ घालत आहे. अनेक प्रादेशिक सिनेमे आता बॉलिवूडला टक्कर देत आहेत. मराठीतील आगामी सिनेमा 'विषय हार्ड'ची सध्या चर्चा आहे. सुमित पाटील (Sumit Patil) आणि पर्ण पेठे (Parna Pethe) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विषय हार्ड' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'येडं हे मन माझं' असे गाण्याचे बोल आहेत. 

'विषय हार्ड' मध्ये तरुण वयातील प्रेम दाखवण्यात आलं आहे. पर्ण पेठे पुन्हा एकदा तिच्या क्युट लूकमध्ये दिसत आहे. तिची तुलना पुष्पाच्या 'श्रीवल्ली'शी करण्यात येत आहे. पहिल्या वहिल्या प्रेमाची तुमची आमची गोष्ट असं म्हणत 'येडं हे मन माझं' गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमात पर्णने डॉली तर अभिनेता सुमित पाटीलने संद्याचं पात्र साकारलं आहे. सुमित आणि पर्णची रोमँटिक केमिस्ट्री गाण्यात पाहायला मिळत आहे. काही मिनिटातच गाणं व्हायरल झालं आहे.  युट्यूबवर गाणं उपलब्ध आहे.

'विषय हार्ड' या चित्रपटाची निर्मिती बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज यांनी केली असून गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील हे निर्माते आहेत. पर्ण पेठे आणि सुमित या नव्या कोऱ्या जोडीसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलावंतही महत्वपूर्ण भूमिकांतून दिसतील.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसंगीतपर्ण पेठे