Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीत सेरेमनी ते सातफेरे ! परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचा असा आहे वेडिंग प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 19:04 IST

रिपोर्टनुसार 24 सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजांनुसार हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ते विवाहबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान दोघांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होतेय.  

रिपोर्टनुसार 24 सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजांनुसार हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम उदयपूरच्या हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या . २३-२४ सप्टेंबरपासून परिणीती आणि राघव यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार आहे. या जोडप्याने त्यांच्या संगीतासाठी 90 च्या दशकाची थीम देखील ठेवली आहे.

संगीत २३ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता. लग्नाची वरात २४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता. लग्नाचा मुहूर्त दुपारी ३.३० वाजता. फेरे २४ सप्टेंबर संध्याकाळी ४ वाजता. पाठवणी २४ सप्टेंबर संध्याकाळी ६.३० वाजतारिसेप्शन २४ सप्टेंबर रात्री ८.३० वाजता.  

परिणीती चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'उंची' चित्रपटात दिसली होती. आता ती अमर सिंग चमकीला यांच्या बायोपिक 'चमकिला'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले असून यामध्ये परिणीतीसोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :परिणीती चोप्रा