Join us

परिणीती-राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी बुक केला लीला पॅलेसमधील महाराजा सूट, एका रात्रीचं भाडं लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:07 IST

Parineeti-Raghav Wedding : उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासाठी लीला पॅलेसमधील महाराजा सूट ही खास खोली बुक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांची लगीनघाई सुरू आहे. परिणीती आणि राघव चड्ढा २४ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. परिणीती आणि  लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार आहे. ३५०० स्केअर फूट जागेत पसरलेल्या या हॉटेलमध्ये परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी अनेक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. जगातील बेस्ट १०० हॉटेलमध्ये या हॉटेलचा समावेश आहे. तर भारतातील सगळ्यात आवडत्या पाच हॉटेलपैकी एक लीला पॅलेस आहे. 

परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी लीला पॅलेसमधील महाराजा सूट ही खास खोली बुक करण्यात आली आहे. याचं एका रात्रीचं भाडं १० लाख रुपये इतकं आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल चाहतेही उत्सुक आहेत.  

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटी