Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यानंतर तीन दिवसांनी परिणीती चोप्राने सोडली दिल्ली, भावूक होत अभिनेत्री म्हणाली-माझे ह्रदय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 20:11 IST

एंगेजमेंटनंतर तीन दिवसांनी परिणीती दिल्ली सोडून मुंबईला रवाना झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pariniti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. दिल्लीतील कपूरथाला हाऊस याठिकाणी हा सोहळा थाटामाटात साजरा झाला. यावेळी अनेक नेते मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या एंट्रीने सर्वांचंच लक्ष वेधलं. यादरम्यानचे परिणीती आणि राघव यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एंगेजमेंटनंतर तीन दिवसांनी परिणीती दिल्ली सोडून मुंबईला रवाना झाली आहे. ज्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. परिणीती चोप्राने काही तासांपूर्वी दिल्लीला बाय बाय म्हटलं आहे.दिल्लीला निरोप देण्यापूर्वी परीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शहराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यावर तिने लिहिले - बाय बाय दिल्ली... माझे हृदय मागे सोडून... परीचे हे कॅप्शन पाहून असे स्पष्टपणे म्हणता येईल की ती तिच्या होणाऱ्या पती राघवला खूप मिस करणार आहे.

राघव - परिणीती यांचा विवाह शाही थाटात होणार आहे. त्यांचे लग्न रॉयल होणार आहे. लग्नात फक्त जवळच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. हिवाळ्यात राघव-परिणीती विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राघव आणि परिणीती यांचे लग्न ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा देखील उपस्थित राहणार आहे. तिच्याशिवाय कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, किआरा आडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लग्नाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रा