Join us
Daily Top 2Weekly Top 5

Parineeti Chopra : शेवटी बापच तो ! परिणीतीच्या साखरपुड्यात वडील रडले, नेटकरी ही झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 18:32 IST

मुलगी आणि वडिलांचं नातं का खास असते, ते शब्दात सांगणे कठीण आहे.

मुलगी आणि वडिलांचं नातं का खास असते, ते शब्दात सांगणे कठीण आहे. प्रत्येक वडिलांसाठी, मुलीचे लग्न हे एक स्वप्न असते, जे तो तिच्या जन्मापासून सुरु होते. सध्या बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टी (आप) नेते राघव चड्ढा यांचा साखरपुडा सगळीकडे  चर्चा आहे. एंगेजमेंटची काही खास फोटो अभिनेत्रीने स्वतः शेअर केली आहेत. या फोटोंमधील एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात फोटोत परिणीतीचे बाबा डोळे पुसताना दिसतायेत. 

प्रियंका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची नुकतीच दिल्लीत एंगेजमेंट झाली.  गुरुद्वारामध्ये साखरपुड्याचे विधी सुरू असताना परिणीतीचं वडील पवन चोप्रा यांचं डोळे भरून आले, अभिनेत्रीच्या वडिलांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.नेटकरी ही हा फोटो पाहून भावूक झालेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर १३ मे रोजी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर आता ती विवाहबद्ध कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. साखरपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगले आहे. सध्या बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातही परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत आहे.  

टॅग्स :परिणीती चोप्रा