'पंचायत' वेबसीरिज (panchayat webseries) चांगलीच गाजली. या वेबसीरिजच्या हलक्याफुलक्या कथानकामुळे लोकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण झाली. 'पंचायत'चे तीनही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता 'पंचायत'ला टक्कर द्यायला प्राइम व्हिडीओवर एक खास वेबसीरिजची घोषणा करण्यात आलीय. या वेबसीरिजची ग्रामीण पार्श्वभूमी असून सर्वांना या वेबसीरिजची उत्सुकता लागून राहिली आहे. या वेबसीरिजचं नाव आहे 'दुपहिया' (dupahiya). काय असणार या वेबसीरिजची कहाणी? जाणून घ्या.
दुपहियाची कहाणी काय असणार?
'दुपहिया' वेबसीरिजची कहाणी काल्पनिक आहे. धडकपूर गावात या वेबसीरिजची कथा घडते. आजवर एकही अपराध घडला नाही म्हणून हे गाव २५ वर्ष पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करतं. परंतु अचानक शांत, समाधानी असलेल्या गावात मिठाचा खडा पडतो. कारण गावातील एक दुचाकी चोरी होते. आता ही बाइक नेमकी कोणी चोरली, २५ वर्षांपासून अपराधमुक्त असलेल्या धडकपूर गावात कोणी अपराध केला? या उत्तरांचा शोध 'दुपहिया' ही वेबसीरिज घेणार आहे. 'पंचायत'सारखीच ग्रामीण पार्श्वभूमी असलेली हलकीफुलकी कहाणी 'दुपहिया'मधून पाहायला मिळणार आहे.
कधी रिलीज होणार 'दुपहिया'?
'दुपहिया' या वेबसीरिजमध्ये रेणुका शहाणे, गजराज राव, भुवन अरोरा, स्पर्श श्रीवास्तव, शिवानी रघुवंशी आणि यशपाल शर्मा या कलाकारांची 'दुपहिया' वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. प्राइम व्हिडीओवर 'दुपहिया' ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. ७ मार्च २०२५ ला ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. आता ही वेबसीरिज नेमकी कशी आहे हे रिलीज झाल्यावर कळेलच.