Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कौन है'मध्ये दिसणार पल्लवी सुभाष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:00 IST

या आठवड्यात, शो अजून एक रोमांचित करणारी मा नावाची कथा सादर करणार आहे आणि ती तुम्हाला घाबरविणार आहे.

कलर्सचा नवा प्रस्ताव कौन है? ने प्रत्येक आठवड्याला एक भीतिदायक गोष्ट सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या खुर्चीत खिळवून ठेवले आहे. या आठवड्यात, शो अजून एक रोमांचित करणारी मा नावाची कथा सादर करणार आहे आणि ती तुम्हाला घाबरविणार आहे. या कथेमध्ये लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी सुभाष आणि नामवंत अभिनेत्री लिली पटेल दिसणार आहेत. 

जमशेदपूरच्या पार्श्वभूमी घडणारी ही कथा, एका तरूण जोडप्या भोवती फिरते आहे जे नुकतेच त्यांची म्हातारी आंधळी आई, त्यांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी यांच्या सोबत त्यांच्या नव्या घरात रहायला आले आहेत. काही दिवसां नंतर त्यांच्या मुलीला काहीतरी दिसू लागते आणि तिचे आईवडील त्यावर विश्वास ठेवत नाहीत जोपर्यंत तो आत्मा त्यांच्या वर भुताटकी करत नाही तोपर्यंत. त्यांच्या मुलीला त्या आत्म्यापासून वाचविण्यासाठी, आईवडील त्यातून सुटका मिळण्याचे मार्ग शोधू लागतात. या भूमिके विषयी बोलताना, पल्लवी सुभाष म्हणाल्या, “भयपट हा माझा नेहमीच आवडता प्रकार आहे. मी एका दशकापासून या रोमांचित करणाऱ्या प्रकारात सहभागी होण्याची वाट पहात होते. आणि ते वाट पाहणे कौन है मधून संपुष्टात आले आहे. परामानसिक गोष्टींचा अनुभव घेण्याची मला नेहमीच उत्सुकता लागून राहिली आहे की त्या खऱ्या असतात की काल्पनिक असतात. मला भयपट आवडतात आणि परामानसिक गोष्टींचा अनुभव घेण्याची माझी तहान भागविण्यासाठी मी या शो मध्ये भाग घेतला आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांनाही ते आवडेल!”

काही परामानसिक गोष्टींचे स्पष्टीकरण करता येते तर काहींचे करता येत नाही. या वीकेंडला मा ची थरारकता अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. त्या आत्म्यापासून त्यांच्या मुलीला वाचविण्यात ते जोडपे यशस्वी होईल का किंवा तो आत्मा त्या कुटुंबावर भुताटकी करणे चालू ठेवेल?

टॅग्स :पल्लवी सुभाष