Join us

'तारक मेहता'च्या सोनूचा 'देसी गर्ल' वर डान्स, मरुन रंगाच्या साडीत दिसतेय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:02 IST

सोनूने आपल्या डान्स परफॉर्मन्सने स्टेजवर लावली आग

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोनू म्हणजेच अभिनेत्री पलक सिंधवानी (Palak Sindhwani) सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. नुकताच तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती देसी गर्ल गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. तसंच तिने परिधान केलेल्या मरुन रंगाच्या साडीत ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. तिचा डान्स पाहून चाहतेही दंग झालेत. पलकने सोशल मीडियावर अक्षरश: आग लावली आहे.

पलक सिंधवानीने 'सोनू'च्या भूमिकेतून प्रेक्षकांना आपलंसं केलं. तारक मेहताचे चाहते काही कमी नाहीत. त्यात सोनूच्या भूमिकेत आधी वेगळी अभिनेत्री होती. तिची जागा काही वर्षांनी पलकने घेतली. पलकलाही चाहत्यांचं तितकंच प्रेम मिळालं. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग झाला. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या डान्स व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'देसी गर्ल' गाण्यावर डान्स करत तिने स्टेजवर आग लावली आहे. मरुन रंगाच्या साडीत तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. पलकने कॅप्शनमध्ये लिहिले,'ऑन पब्लिक डिमांड, माझ्या इम्प्रॉम्टु परफॉर्मन्सची एक झलक. साडी नेसून देसी गर्लवर डान्स नाही केला तर काय केलं?'

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले,'पलक तू परीसारखीच आनंदात आणि आत्मविश्वासाने नाचतेस, खूप सुंदर डान्स','या ग्रहावरची सर्वात सुंदर मुलगी'. पलकला मिळणारा हा प्रतिसाद पाहता तिची लवकरच बॉलिवूड एन्ट्रीही होऊ शकते. सध्या ती टेलिव्हिजनवर लोकप्रिय आहे. 

 

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारनृत्य