Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांना या तीन चुकांचा आजही आहे पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 11:19 IST

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील तीन मोठ्या चुकांचा आजही पश्चाताप वाटतो.

प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कधीना कधी चुकत असतो. पण कधीकधी या चुकांचा कायमस्वरूपी पश्चाताप वाटत राहतो. असंच काहीसं झालंय बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबाबतीतही. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील तीन मोठ्या चुकांचा आजही पश्चाताप वाटतो.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकारणात येणं ही अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती जी चूक ते स्वत: मान्य करतात. अमिताभ भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यानुसार राजकारणात आले. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी आपल्या निष्ठावंतांची एक टीम तयार करीत होते आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्यांविरूद्ध भारी उमेदवार उभे करण्याची गरज होती जे विरोधी नेत्यांचा पराभव निश्चित करून त्यांना पळून जाण्याचा मार्ग बंद करतील. त्यांनी अलाहाबादमधून हेमवती नंदन बहुगुणाविरूद्ध अमिताभ बच्चन यांची निवड केली आणि बहुगुणा यांचा प्रचंड मतांनी पराभव करत अमिताभ यांनी ही निवडणूक जिंकली. अमिताभ बच्चन चित्रपट आणि राजकारण अशी दोन्ही कारकीर्द सांभाळत होते.

याच काळात अमिताभ बच्चनचे अनेक चित्रपटही रिलीज झाले, ज्यात मर्दने बॉक्स ऑफिस वर चांगला व्यवसाय केला. चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे अमिताभ बच्चन राजकारणापासून दूर जात होते, याचा राजकीय विरोधकांनी जोरदारपणे फायदा उठविला.

बोफोर्स, फेअरफॅक्स आणि पाणबुडी घोटाळ्यांमध्ये अमिताभ यांचे नाव घेतले गेले आणि हा दबाव अमिताभ बच्चन सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी राजकारणाला रामराम केला. याबद्दल जेव्हा अमिताभ यांना विचारले गेले, तेव्हा त्यांचे म्हणणे होते की “सरकारी मुद्द्यांमध्ये भरकटने चुकीचे होते. त्यावेळी मला समजले की राजकीय क्षेत्रात भावना पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणून मी शरण गेलो.

१९९५ साली मीडिया हाऊस सोबत अमिताभ बच्चन यांचे अनेक वाद होते. मीडियाशी पंगा घेतल्यानंतर बिग बींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत काही चित्रपटात काम केल्याबद्दल पश्चाताप वाटतो.

निशब्द या चित्रपटात त्याच्या वयापेक्षा म्हणजे अर्ध्यापेक्षा लहान मुलीसोबत अमिताभ बच्चन यांनी प्रेम वगैरे करणं लोकांना आवडले नाही. त्याच वेळी बूम ३ दर्जाचे आणि खराब मूव्ही होता आणि आजही चित्रपटातील त्यांचे सीन पाहून अमिताभ बच्चन यांना लाजिरवाणे वाटतं.

टॅग्स :अमिताभ बच्चन