ऑस्कर २०२५ (Oscar Awards 2025) म्हणजेच ९७ वा अकादमी पुरस्कार २ मार्च २०२५ रोजी लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदा पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायन करत आहे. रेड कार्पेटवर अनेक कलाकारांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एड्रियन ब्रॉडीला 'द ब्रुटलिस्ट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'अनोरा' चित्रपटासाठी सीन बेकरने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पुरस्कार २३ श्रेणींमध्ये दिला जाणार आहे. २०२४ मध्ये जिथे 'ओपेनहाइमर'चे वर्चस्व होते. त्याचवेळी, यावेळी नजर 'एमिलिया पेरेझ'वर आहे, ज्याला १३ नामांकन मिळाले आहेत. आणि 'द ब्रुटालिस्ट' आणि मूव्ही म्युझिकल 'विकेड' देखील प्रत्येकी १० नामांकनांसह या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, कोणाला किती ट्रॉफी मिळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या व्यतिरिक्त, भारतीयांसाठी देखील हा एक अतिशय रोमांचक क्षण असणार आहे कारण 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले आहे. हा लघुपट पुरस्कार मिळवेल की नाही, हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
कियरन कल्किन ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताया सोहळ्याची सुरुवात लॉस अँजेलिसच्या श्रद्धांजलीने झाली, गायिका एरियाना ग्रांडेने 'समव्हेअर ओव्हर द रेनबो' हे गाणे सादर केले. जानेवारीमध्ये लॉस अँजेलिसमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. अ रिअल पेनसाठी कियरन कल्किन(Kieran Culkin)ने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्याने एडवर्ड नॉर्टन, युरा बोरिसोव्ह, गाय पियर्स आणि सहकलाकार जेरेमी स्ट्राँग यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, 'माझ्या पालन पोषणासाठी माझी आई आणि स्टीव्ह यांचे आभार मानावे लागतील. तुम्ही खरोखरच छान लोक आहात.'
'फ्लो'ने जिंकला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार 'फ्लो'ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला. अँड्र्यू गारफिल्ड आणि गोल्डी हॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'माझ्या मांजरी आणि कुत्र्यांचे आभार,' दिग्दर्शक गिंटास झिबालोडिस यांनी यावेळी म्हटले.'फ्लो'ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला. अँड्र्यू गारफिल्ड आणि गोल्डी हॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'माझ्या मांजरी आणि कुत्र्यांचे आभार,' दिग्दर्शक गिंटास झिबालोडिस यांनी यावेळी म्हटले.
'इन द शॅडो ऑफ द सायप्रस'ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपटाचा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर शिरीन सोहानी आणि होसैन मोलायेमी यांना त्यांच्या 'इन द शॅडो ऑफ सायप्रस' या चित्रपटासाठी मिळाला. अँड्र्यू गारफिल्ड आणि गोल्डी हॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक होसेन मौलायेमी यांनी आपल्या भाषणात याला चमत्कार म्हटले.
'विकेड'ने पटकावला सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाईनचा पुरस्कारसर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाईनसाठी ऑस्कर जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय माणूस म्हणून पॉल टेजवलने इतिहास घडवला.
सीन बेकरने जिंकला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा पुरस्कार एमी पोहलरने सादर केलेल्या 'अनोरा'साठी शॉन बेकरला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
पीटर स्ट्रॉघनने जिंकला सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेचा पुरस्कार पीटर स्ट्रॉघनला 'कॉनक्लेव्ह'साठी सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा ऑस्कर मिळाला. ॲमी पोहेलर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'द सबस्टन्स'ला मिळाला सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलचा ऑस्कर पुरस्कार 'द सबस्टन्स'ला देण्यात आला. हा पुरस्कार स्कारलेट जोहानसन आणि जून स्क्विब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सीन बेकरला 'अनोरा'साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलनाचा पुरस्कार 'अनोरा'साठी सीन बेकरला बेस्ट फिल्म एडिटिंगचा पुरस्कार मिळाला. शॉन बेकरसाठी आजचा दुसरा ऑस्कर होता. भाषणादरम्यान तो गमतीशीरपणे म्हणाला, 'मी हा चित्रपट एडिटिंगमध्ये सेव्ह केला.'
जो सलदाना ठरली सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीजो सलदानाला 'एमिलिया पेरेझ'साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ती भावुक झालेली पाहायला मिळाली. तिने एमिलिया पेरेझ आणि उर्वरित कलाकार आणि क्रू मधील तिच्या पात्राची प्रशंसा केली.
यावेळी ती म्हणाली की, 'या सन्मानाने मी भारावून गेले आहे. माझी आजी १९६१ मध्ये या देशात आली. स्वप्ने, सन्मान आणि मेहनती हात असलेल्या स्थलांतरित पालकांचा मी अभिमानास्पद मुलगी आहे आणि अकादमी पुरस्कार स्वीकारणारी मी पहिली डोमिनिकन-अमेरिकन आहे. मला माहित आहे की मी शेवटची असणार नाही. मला आशा आहे की मला अशा भूमिकेसाठी पुरस्कार मिळेल ज्यामध्ये मला स्पॅनिशमध्ये गाणे गाण्याची आणि संवाद बोलण्याची संधी मिळाली. माझी आजी, जर ती येथे असती तर तिला खूप आनंद झाला असता.
प्रॉडक्शन डिझाईनमध्ये 'विकेड' अव्वल'विकेड' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइनचा ऑस्कर पुरस्कार नॅथन क्राउली आणि ली सँडल्स यांना देण्यात आला. नॅथनने प्रॉडक्शन डिझाईन केले आहे, तर लीने सेट डेकोरेशनचे काम सांभाळले आहे.
एमिलिया पेरेजच्या 'एल मल' गाण्याला मिळाला ऑस्कर'एमिलिया पेरेज' या चित्रपटाला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला आहे. क्लेमेंट ड्युकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियर्ड यांना या गाण्यासाठी ऑस्कर देण्यात आला.
'द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा'ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार'द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा'ला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सेलेना गोमेझ आणि सॅम्युअल एल जॅक्सन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
'नो अदर लँड' ठरली बेस्ट डॉक्यूमेंट्री फिल्म 'नो अदर लँड'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. सेलेना गोमेझ आणि सॅम्युअल एल. जॅक्सन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'ड्यून: पार्ट टू'ला मिळाला बेस्ट साउंडचा पुरस्कार'ड्यून: पार्ट टू'ला मिळाला बेस्ट साउंडचा पुरस्कार मिळाला आहे. माईल्स टेलर आणि मायली सायरस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
'आय एम नॉट ए रोबोट' ठरली लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मव्हिक्टोरिया वारमेर्डन आणि ट्रेंटच्या 'आय एम नॉट अ रोबोट'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला. ॲडम जे ग्रेव्हज आणि सुचित्रा मित्तई यांच्या 'अनुजा' या चित्रपटाच्या हातून ऑस्कर निसटला.
'द ब्रुटलिस्ट'ला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार 'द ब्रुटलिस्ट'ला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, जो लॉल क्रॉलीने जिंकला.
बेस्ट इंटरनेशनल फिचर फिल्म'आय एम स्टिल हिअर' (ब्राझील)ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
'द ब्रुटलिस्ट'ला बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा पुरस्कार डॅनियल ब्लमबर्ग यांना 'द ब्रुटलिस्ट' मधील त्यांच्या कामासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
एड्रियन ब्रॉडी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडीला 'द ब्रुटलिस्ट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. सिलियन मर्फी यांनी हा पुरस्कार दिला.
'अनोरा'साठी सीन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक'अनोरा' चित्रपटासाठी सीन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर २०२५ मधील शॉन बेकरचा हा दुसरा आणि 'अनोरा' चित्रपटासाठी तिसरा पुरस्कार आहे.
मिकी मॅडिसन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअभिनेत्री मिकी मॅडिसनला 'अनोरा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
'अनोरा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपटसर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी 'अनोरा'ची निवड करण्यात आली. 'अनोरा'साठी हा ऑस्कर २०२५चा पाचवा पुरस्कार आहे. मेग रयान आणि बिली क्रिस्टल यांनी पुरस्कार प्रदान केला.