Join us

Oscar 2023 Entry: यंदा गुजरातच्या 'छेल्लो शो' चित्रपटाला 'ऑस्कर'चं तिकीट; RRR, द काश्मीर फाईल्सचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:56 IST

गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' भारताचं प्रतिनिधित्व ऑस्करमध्ये करणार आहे.

ऑस्कर 2023च्या नामांकनांचे निकाल जाहीर झाले आहेत. RRR, The Kashmir Files कडून या यादीत अनेक चित्रपटांची चर्चा झाली होती, आता भारत सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे की गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार 2023 साठी भारताकडून अधिकृत प्रवेश असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले आहे, ज्याचे लेखनही नलिन यांनीच केले आहे.  

 या चित्रपटात भाविन राबरी, भावेश श्रीमाळी, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२१ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा दाखवण्यात आला होता. यानंतर हा चित्रपट अनेक वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये दाखवला गेला आहे जिथे त्याला खूप पसंती मिळाली आहे.

टॅग्स :ऑस्कर नामांकनेआरआरआर सिनेमा