Join us

एकता कपूरच्या आगामी सिनेमात दिसणार ही जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 12:43 IST

'हसी तो फसी' चित्रपटानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा आणखीन एका चित्रपटात दिसणार आहेत.

ठळक मुद्देसिद्धार्थ-परिणीती गिरवणार बिहारी भाषेचे धडेतब्बल ४ वर्षानंतर परिणीती व सिद्धार्थ दिसणार रुपेरी पडद्यावर

'हसी तो फसी' चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या दोघांची केमिस्ट्री केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. चार वर्षांनंतर पुन्हा ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. निर्माती एकता कपूर आणि शैलेश सिंह यांच्या प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात ही जोडी पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ व परिणीती यांच्या आगामी सिनेमाचे नाव अद्याप समजलेले नाही. पुढील आठवड्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे व पहिले शेड्यूल बिहारमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते आहे. बिहार म्हटल्यावर दोघेही देसी अवतारात दिसणार, यात शंका नाही. दोघेही सध्या आपल्या भूमिकेची जोरदार तयारी करत आहेत. या भूमिकांसाठी बिहारी भाषेचेदेखील धडे गिरवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

'तन्नू वेड्स मन्नू' आणि 'रांझणा' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारे प्रशांत सिंह हे सिध्दार्थ आणि परिणीतीच्या या आगामी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. एकता कपूर प्रोडक्शनच्या य़ा नवीन सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. तसेच सिद्धार्थ व परिणीतीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

सिद्धार्थ विक्रम बत्राच्या बायोपिकमध्येदेखील दिसणार आहे. यात त्याच्यासोबत कियारा सुद्धा दिसणार आहे. विक्रम बत्राच्या बायोपिकबाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा कागरिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि शब्बीर बॉक्सवाला एकत्र येऊन करणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन विष्णु वर्द्धन करणार आहे. यासिनेमाच्या माध्यमातून विष्णु दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रापरिणीती चोप्रा