Join us

... तरच दीपिका स्विकारते सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:30 IST

अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्न झाल्यापासून एकाही सिनेमात दिसली नाही. शेवटची ती रणवीर सिंगसोबत पद्मावत सिनेमात दिसली होती. लवकरच ती ‘छपाक’ आणि ‘83’ मध्ये दिसणार आहे.

‘ओम शांती ओम’ पासून ज्या अभिनेत्रीने आपल्या करिअरला सुरूवात केली आणि अख्ख्या बॉलिवूडवर तिच्या अभिनयाने मोहिनी घातली. सध्याच्या लीडिंग अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपण दीपिकाकडे पाहतो. अशा हरहुन्नरी आणि गॉर्जिअस अभिनेत्रीचा आज वाढदिवस. तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहते  तिला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्न झाल्यापासून एकाही सिनेमात दिसली नाही. शेवटची ती रणवीर सिंगसोबत पद्मावत सिनेमात दिसली होती. लवकरच ती ‘छपाक’ आणि ‘83’ मध्ये दिसणार आहे. तुम्हाला हे ऐकून हैराण व्हाल की दीपिका कोणत्या गोष्टीच्या आधारावर सिनेमात साईन करते. 

इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखती दरम्यान दीपिका म्हणाली की,‘मी आजही सिनेमा १० वर्षांपूर्वीच्या नियमाप्रमाणे निवडते. मी सिनेमा निवडताना माझ्या मनाचे ऐकते. मी तेच सिनेमे करते जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात. सिनेमाची कथा ऐकून मी जर एक्सायडेट झाली तरच सिनेमा साईन करते.’ 

दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेसी अभिनेता दिसणार आहे. तसेच ती ‘८३’ या चित्रपटातही रणवीर सिंगसोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 दीपिका आणि निर्माता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे. महाभारतावर आधारित हा चित्रपट दोन वा अधिक भागात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक