Join us

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:20 IST

सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ‘रजिस्ट्रेशन्स’. हॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आयुष्य बदलवून टाकण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असलेली रजिस्ट्रेशन्स प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु झाली आहे.

११ मार्च ते २० मार्च या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली जाणार आहे. आता रजिस्ट्रेशन्ससाठी शिल्लक आहेत फक्त दोन दिवस, त्यामुळे ज्यांनी अजूनही मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली नसेल तर त्यांनी अचूक उत्तरासाठी ९१६४२९१६४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह ऍपवर रजिस्टर करा.

प्रेक्षकांनी ११ मार्चपासून सुरु झालेल्या रजिस्ट्रेशन्स प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि कमी वेळेत आलेल्या भरपूर एंट्रीजमधून हे दिसून येते की प्रेक्षक या खेळाप्रती फारच उत्सुक आहेत. पण आता फक्त काही तास शिल्लक आहेत म्हणजेच स्पर्धक म्हणून या खेळात सहभागी होण्यासाठी २० मार्च ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे. त्यामुळे या संधीचं सोने करायला विसरु नका आणि सहभागी व्हा ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कारण उत्तर शोधले की जगणे बदलते.

टॅग्स :नागराज मंजुळेसोनी मराठी