Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! मिताली मयेकरने बाथटबमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 10:51 IST

मिताली मयेकरचा बाथटबमधील फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला बरेच दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरीदेखील अद्याप त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सातत्याने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चर्चेत येत असते. नुकताच मिताली मयेकर हिने बाथटबमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. आहे.

मिताली मयेकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते. लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान रिसॉर्टला गेले होते. तिथे बाथटबमध्ये एन्जॉय करतानाचा फोटो मितालीने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, बबली ब्लॅंकेट. तिचा हा फोटो सिद्धार्थ चांदेकरने क्लिक केला आहे. 

यापूर्वीदेखील मिताली मयेकर हिने बाथटबमधील फोटो शेअर केला होता. त्यात ती पाठमोरी दिसत होती. 

पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.

तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. 

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर