Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG...! तैमूर फोटोग्राफर्सना पलटून देतो हे उत्तर, खुद्द करीना कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:43 IST

करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करण सीझन ६चा अंतिम एपिसोड नुकताच प्रसारीत झाला. या शोमध्ये करीना कपूरसोबत प्रियंका चोप्रानेदेखील हजेरी लावली होती.

करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करण सीझन ६चा अंतिम एपिसोड नुकताच प्रसारीत झाला. या शोमध्ये करीना कपूरसोबत प्रियंका चोप्रानेदेखील हजेरी लावली होती. यावेळी करीनाने तैमूरच्या स्टारडमबद्दल सांगितले. करीनाने सांगितले की, जेव्हा मीडिया, फोटोग्राफर्स त्याचे फोटो घेतात तेव्हा भीती वाटते. कारण तो एक लहान मुलगा आहे आणि तो लाइम लाइटमध्ये जीवन जगतो आहे.

करीनाने पुढे सांगितले की, आता त्याला समजते की तैमूरच्या नावाने सर्वजण त्याला हाक मारतात. त्यामुळे जेव्हा फोटोग्राफर्स त्याला हाक मारतात तेव्हा तो पलटून उत्तर देतो. मी तैमूरला येण्या-जाण्यासाठी बंदी टाकू शकत नाही. तसेच फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी मनाईदेखील करू शकत नाही. तैमूर पापाराजीचा फेव्हरिट आहे. त्याच्या काही व्हिडिओ व फोटोज आहेत ज्यात तो हात दाखवताना दिसतो.तैमूर खूप फ्रेंडली चाइल्ड आहे.

करीनाने एका मुलाखतीत सांगितले की, तैमूरच्या हातात जीवन आहे. मात्र सैफ तर बराच वेळ तैमूरसोबत वेळ व्यतित करण्यासाठी सैफ शूटिंगदेखील रद्द करतो. 

या दरम्यान करण जोहरने तैमूरच्या डॉलबद्दल करीनाला विचारले असता ती म्हणाली की, तो डॉल अजिबात माझ्या तैमूरसारखा नाही आहे. डॉलचे डोळे नीळे आहेत, त्याचे केस विचित्र आहेत आणि बंद गळ्याचे जॅकेट. माझा मुलगा असा अजिबात नाही. 

टॅग्स :करिना कपूरतैमुरसैफ अली खान