Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! भूताटकी...? रितेश देशमुखचं अचानक डोकं झालं धडापासून वेगळं, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:43 IST

रितेश देशमुखचा हा व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे फनी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रितेश देशमुखने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओत तो बाल्ड लूकमध्ये दिसतो आहे आणि शिड्यांवर बसलेला पहायला मिळतो आहे. थोड्याच वेळात त्याचे डोके धडापासून वेगळे होऊन शिड्यांवर चालू लागते. रितेश देशमुखने त्याच्या चाहत्यांना एण्टरटेन करण्यासाठी हा प्रँक केला आहे. त्याचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होतो आहे. 

रितेश देशमुखने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, कोरोना व्हायरसच्या दरम्यान मज्जा करण्याची वेळ. हेडवॉक. हा व्हिडिओ पाहून रितेशच्या चाहत्यांनी त्यावरव खूप प्रतिक्रिया दिल्या. 

नुकताच रितेशने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तो बाल्ड लूकमध्ये दिसला होता. त्यात त्याने लिहिले की, मैं हू खलनायक मॅजिक मिरर. या व्हिडिओत रितेश कपड्याने आरसा साफ करत होता. त्यावेळी आरशात त्याचा बाल्ड लूक पहायला मिळाला. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला संजय दत्तचे गाणंदेखील वाजत आहे.

रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो नुकताच टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरसोबत बागी 3मध्ये दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्याआधी रितेश हाउसफुल 4मध्ये झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 

टॅग्स :रितेश देशमुखबागी ३