Join us

बापरे...! भूषण प्रधानवर का वेळ आली टक्कल करण्याची, पहा त्याचा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 18:26 IST

अभिनेता भूषण प्रधानने मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देभूषणने आगामी प्रोजेक्टसाठी केलं टक्कल

अभिनेता भूषण प्रधानने मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याचे टक्कल करत असल्याचे पहायला मिळतंय. आता नेमकं हा टक्कल का करत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.

बऱ्याचदा कलाकारांना त्यांच्या भूमिकेसाठी विविध गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी कधी वजन घटवावे किंवा वाढवावे लागते. तर कधी केस वाढवावे लागतात तर कधी बाल्ड लूक करावा लागतो. भूषण प्रधानलाही त्याच्या आगामी भूमिकेसाठी टक्कल करावे लागले. पण, तो कोणती भूमिका करणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

भूषणनं २५ जून रोजी इंस्टाग्रामवर चाळीस -पन्नासच्या दशकातील एका वेशभूषेचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसह त्याने लिहिलं की, २५ जून आज तुमचा वाढदिवस... तुमची जयंती. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा जन्म चिंचवडचा आणि मी लहानाचा मोठा झालो तो चिंचवड येथेच. लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवरून फिरताना न चुकता चौकात पोहोचल्यावर मान वर करून तुमच्या पुतळ्याकडे बघायचो. इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या बद्दल एका धड्यात वाचताना सुद्धा खूप अभिमान वाटायचा. तेव्हा कल्पनाही नव्हती की मोठा झाल्यावर एक दिवस मला तुमची भूमिका साकारायला मिळेल. झी5 साठीची ही web series लवकरच प्रदर्शित होईल. चित्रिकरण अतिशय उत्तम आणि जोमाने सुरु आहे. आज भूमिकेसाठी म्हणून तुमचं आत्मवृत्त वाचताना, तुमच्या बद्दल अजून जाणून घेताना एकच लक्ष्यात येतंय की किती कमी माहित होतं मला तुमच्याबद्दल. तुमची भूमिका योग्यरित्या साकारता यावी म्हणून मी, आमचे निर्माते, दिग्दर्शक आणि अख्खी टीम मनापासून कष्ट घेत आहोत. तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात.

भूषण प्रधान लवकरच झी५च्या एका वेब सीरिजमध्ये पहायला मिळणार हे नक्की!

टॅग्स :भुषण प्रधान