Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला टायटॅनिक पोझ द्यायला गेली आणि ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली, शेफाली जरीवालाचा व्हिडीओ Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:36 IST

शेफाली जरीवाला एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती. यावेळी, तिचा पती पराग त्यागीही तिच्याबरोबर होता. शेफालीने यावेळी फ्रिल स्टाईल ड्रेस परिधान केला होता.

'काटा लगा' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली शेफाली जरीवाला या काळात अभिनयाच्या जगापासून लांब आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. शेफाली सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते.सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे.त्यामुळे सेलिब्रेटी त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करतात या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. रसिकांनाही त्यांच्या सगळ्याच अपडेट जाणून घेण्यात रस असतो. कधी कधी असे काही घडते की त्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगितल्या जातात.

 

अनेकदा अभिनेत्रींवर लाजिरवाना प्रसंग घडतो तो देखील सोशल मीडियावर कळत- नकळत व्हायरल होतो. शेफाली जरीवालाचा पतीसोबत मालदीव्हजमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात Oops मूमेंटला बळी पडल्याचे समोर आले आहे. आता तिचा हा व्हिडीओ याच कारणामुळे खूप व्हायरल देखील होत आहे.

शेफाली जरीवाला एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती. यावेळी, तिचा पती पराग त्यागीही तिच्याबरोबर होता. शेफालीने यावेळी फ्रिल स्टाईल ड्रेस परिधान केला होता, तितक्यात जोरदार वारा आला आणि ड्रेसही उडायला लागला. जोरदार वा-यामुळेच ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली. शेफालीने यावेळी स्वतःला पटकन सावरल्याचेही दिसतंय.

अनेकदा शेफाली तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अनेकदा फॅशन एक्सप्रिमेंट करत शेफाली दिसते. पण ती फॅशनमुळे तिला अनेकादा चाहत्यांच्या संतापाचाही सामना करावा लागतो. शेफालीला तसेही फारसा ट्रोलिंगचा फरक पडत नाही. त्यामुळे तिला जसे वाटेल तशी ती फॅशन करताना दिसते. अनेकदा तिचा अंदाज चाहत्यांचा पसंतीस पात्र ठरतो. सध्या कोणते काम तिच्याकडे नसल्यामुळे तिला रसिकांच्या भेटीला येत नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचे फोटो व्हिडीओ धुमाकुळ घालत असतात. 

टॅग्स :शेफाली जरीवाला