Join us
Daily Top 2Weekly Top 5

14 व्या वर्षी मोलकरणीच्या प्रेमात पडले होते ओम पुरी, पत्नीनेच केला होता खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 08:00 IST

दिग्गज अभिनेते ओम पुरी आज आपल्यात नाहीत. पण त्यांचा अभिनय, त्यांचा तो भारदस्त आवाज कायम प्रेक्षकांच्या मनात स्मरणात राहील.

ठळक मुद्दे पत्नी नंदिताने लिहिलेल्या पुस्तकानंतर ओम पुरी व त्यांच्या पत्नीचे संबंध बिनसले होते.

दिग्गज अभिनेते ओम पुरी आज आपल्यात नाहीत. पण त्यांचा अभिनय, त्यांचा तो भारदस्त आवाज कायम प्रेक्षकांच्या मनात स्मरणात राहील.  त्यांच्याकडे देखणा चेहरा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. 1950 साली आजच्याच दिवशी म्हणजेच, 18  ऑक्टोबरला ओम पुरी यांचा जन्म झाला होता.  

 ओम पुरी यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. अगदी कोळसा वेचण्याचे काम त्यांनी केले. इतकेच नाही तर ढाब्यावर भांडीही घासली.

 ओम पुरी ज्या घरात राहायचे, त्यामागे एक रेल्वे यार्ड होते. रात्री ओम पुरी घरून पळून ट्रेनमध्ये झोपायला जात. रेल्वेबद्दल त्यांच्या मनात एक वेगळेच कुतूहल होते. यामुळे मोठे होऊन त्यांना ट्रेन ड्रायव्हर व्हायचे होते. काही वर्षांनंतर ओम पुरी पंजाबच्या पटियाला येथे आपल्या आजीकडे राहायला गेले.

 ओम पुरी यांचे अख्खे आयुष्य वादांनी भरलेले राहिले. त्यांची पत्नी नंदिताने त्यांच्यावर लिहिलेल्या ‘द अनलाइकली हीरो : द स्टोरी आॅफ ओम पुरी’ या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे केले होते. त्यानुसार, ओम पुरी यांचे वयाच्या 14 व्या वर्षी घरी काम करणा-या मोलकरणीवर प्रेम जडले होते. ओम पुरी तेव्हा आपल्या आजीच्या घरी राहत. आजीच्या घरी काम करणा-या 55 वर्षांच्या मोलकरणीवर ओम पुरी यांचा जीव जडला होता. ही मोलकरीणही ओम पुरी यांची काळजी घ्यायची. एक दिवस घराचे लाईट गेलेत. संधी साधून मोलकरणीने ओम पुरी यांना गाठले. त्यावेळी ओम पुरी यांनी या मोलकरणीसोबत पहिल्यांदा शरिरसंबंध बनवले. या पुस्तकाचे नाव ‘असाधारण नायक ओम पुरी’ असे आहे. पत्नी नंदिताने लिहिलेल्या या पुस्तकानंतर ओम पुरी व त्यांच्या पत्नीचे संबंध बिनसले होते. या पुस्तकाने माझी प्रतिमा मलीन केली, असे ओम पुरी एका मुलाखतीत म्हणाले होते. प्रकाशनापूर्वी पत्नीने मला हे पुस्तक वाचू दिले नाही. पत्नी या नात्याने तिने माझा विश्वासघात केला, असेही ते म्हणाले होते. यानंतर नंदिताने ओम पुरींवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. यापश्चात ओम पुरी व नंदिता पूर्णत: विभक्त झाले होते. 

टॅग्स :ओम पुरी