Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा ! सुशांतचा ‘दिल बेचारा’ सिनेमा मोफत उपलब्ध असूनही झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 17:20 IST

सुशांतच्या या सिनेमाने काही तासांतच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला आतापर्यंतIMDb वर 10 पैकी 10 रेटिंग मिळाले आहेत, जे आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला मिळाले नाही.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे अनेक मोठे चित्रपट आता ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' अखेर प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होताच रसिकांच्या प्रतिक्रीयाही सोशल मीडियावर उमटू लागल्या होत्या. 

डिस्ने प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे.  सिनेमा फ्री उपलब्ध असूनही लीक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लीक झालेला चित्रपट हा एचडी क्वालिटीचा आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही तासात हॉटस्टार क्रॅश झाल्याच्या तक्रारी देखील अनेक युजर्सनी केल्या होत्या. 

सुशांतच्या या सिनेमाने काही तासांतच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला आतापर्यंतIMDb वर 10 पैकी 10 रेटिंग मिळाले आहेत, जे आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला मिळाले नाही . सुशांतच्या अभिनयाचे देखील यामध्ये खूप कौतुक होत आहे, मात्र ते पाहण्यासाठी तो आज नाही याची खंत सर्वजण व्यक्त करत आहेत. 

जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच 3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते. विशेष म्हणजे या सिनेमाने हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमच्या ट्रेलरचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. एवेंजर्स: इंफिनिटी वॉरला 3.6 मिलियन लाईक्स मिळाले होते. याच सोबत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक पसंतीचा 'दिल बेचारा' सिनेमाचा ट्रेलर ठरला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत