Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ocars 2020 : ‘जोकर’ स्टार जोक्विन फिनिक्सचा रेड कार्पेटवर झाला रोमॅन्टिक ... पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:51 IST

रोमॅन्टिक केमिस्ट्री...

ठळक मुद्देजोकर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकल्यानंतर जोक्विन फिनिक्सने शानदार भाषण केले. यावेळी तो काहीसा भावूक झालेलाही दिला.

92 व्या ऑस्करसोहळ्यांत ‘जोकर’ या हॉलिवूड सिनेमाचा दबदबा राहिला. या सोहळ्यात जोकरने अनेक पुरस्कार पटकावले. ‘जोकर’चा अभिनेता जोक्विन फिनिक्स यानेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. जोक्विनने ऑस्करवर तर नाव कोरलेच. सोबत ऑस्करच्या रेड कार्पेटवर भावी पत्नीसोबतच्या त्याच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीनेही सर्वांचे लक्ष वेधले.

जोक्विन फिनिक्स त्याची भावी पत्नी रूनी मारासोबत ऑस्कर सोहळ्याला पोहोचला. यावेळी रेड कार्पेटवरची त्यांची एन्ट्री शानदार राहिली. जोक्विन  ब्लॅक टक्सीडोमध्ये तर रूनी ब्लॅक कलरच्या लेस गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरले. यावेळी दोघांनीही एकमेकांचा हात हातात घेतला होता.

रेड कार्पेटवर एकमेकांना अलिंगन देत त्यांनी मीडियाला एकापेक्षा एक रोमॅन्टिक पोज दिल्यात. या कपलचे  फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना रॉयल कपलचा टॅग दिला.

जोक्विन आणि रूनी यांनी यावर्षी साखरपुडा केला. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

‘जोकर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकल्यानंतर जोक्विन फिनिक्सने शानदार भाषण केले. यावेळी तो काहीसा भावूक झालेलाही दिला.

टॅग्स :ऑस्कर