Join us

'ओ मेरी लैला..'; आजवर कधीही पाहिला नाही असा अभिज्ञा भावेचा गॉर्जियस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:04 IST

Abhidnya bhave: अलिकडेच तिने एक भन्नाट व्हिडीओशूट केलं आहे. तिचं हे नवीन शूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave). उत्तम अभिनयासह मनमोकळ्या स्वभावामुळे अभिज्ञाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तू तेव्हा तशी या मालिकेत झळकलेली अभिज्ञा लवकरच एका हिंदी मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्येच तिने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे.

अभिज्ञा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते. यात बऱ्याचदा तिचे फोटोशूट, व्हिडीओशूटदेखील चर्चेत येत असतात. अलिकडेच तिने एक भन्नाट व्हिडीओशूट केलं आहे. तिचं हे नवीन शूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अभिज्ञाने पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये एक फोटो आणि व्हिडीओशूट केलं आहे. यातील तिचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड यातून दिसत आहे. तसंच व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला  देखा एक ख्वाब.. हे गाणं प्ले केलं आहे. अभिज्ञाच्या या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :अभिज्ञा भावेसेलिब्रिटीटेलिव्हिजन