Join us

"आता तू फक्त माझा नवरा नाहीस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:52 IST

Siddharth Chandekar-Mitali Mayekar: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यांचा फसक्लास दाभाडे हा सिनेमाही प्रदर्शित झालाय.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ते दोघेही सतत चर्चेत येत असतात. सध्या ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते त्यांचा आगामी सिनेमा फसक्लास दाभाडेमुळे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दरम्यान आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मिताली मयेकरनेसिद्धार्थ चांदेकरसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा! आता हे खरोखरच खास आहे! आता, तू फक्त माझा नवरा नाहीस, तू माझा सह-अभिनेता देखील आहेस! आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी आमचा पहिला चित्रपट रिलीज होतोय! हे जादुई आहे. तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे हा एक सन्मान आहे. सर्वोत्तम असल्याबद्दल धन्यवाद. असेच आणखी वर्षे एकत्र व्यतित करायची आहेत आणि एकत्र सिनेमा करायचे आहेत. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मितालीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

'फसक्लास दाभाडे' झाला रिलीज'फसक्लास दाभाडे' हा कौटुंबिक ड्रामा सिनेमा आहे. हा चित्रपट आज म्हणजेच २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि मिताली रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, राजसी भावे, हरिश दुधाडे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलंय. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर