Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकच्या आयुष्यातून एली अवराम 'आऊट', ही आहे हार्दिकची नवी गर्लफ्रेन्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:54 IST

दोन आठवड्यांपूर्वीच दोघे वेगळे झाले आहेत. आता या ब्रेकअपबाबत त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. अशातच त्यांचं नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या हा बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामला डेट करत होता, अशी चर्चा होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र बघण्यातही आले होते. आता अशी माहिती समोर येतीये की, दोन आठवड्यांपूर्वीच दोघे वेगळे झाले आहेत. आता या ब्रेकअपबाबत त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. अशातच त्याचं नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. 

ब्रेकअपच्या चर्चांनंतर आता लगेच अशी चर्चा होत आहे की, हार्दिक पांड्याला नवीन गर्लफ्रेन्ड मिळाली आहे. ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री ईशा गुप्ता ही आहे. असे सांगितले जात आहे की, दोघांची भेट एका पार्टीमध्ये झाली आणि तेथूनच दोघांच्या अफेअरची अफवा पसरली. इतकेच काय तर एकाच भेटीत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले.  

दरम्यान, या नव्या अफेअरबाबत दोघांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे. आणि जाहीरपणे सर्वांसमोर न येण्याचा प्रयत्न करत आहेत. ईशा सध्या जेपी दत्ता यांच्या पलटनमध्ये आणि आंखे 2 मध्ये काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे अनेक बोल्ड फोटो वादाचा मुद्दा ठरले होते. पण आता ती या नव्या नात्याबद्दल काही ट्विट करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याईशा गुप्ता