Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिनिलियाच नाही तर देशमुखांची थोरली सूनबाईदेखील होती प्रसिद्ध अभिनेत्री, आता या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:01 IST

Amit Deshmukh's Wife : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा थोरला मुलगा अमित देशमुख यांची पत्नीदेखील एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होती.

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना तीन मुलं असून त्यातील रितेश देशमुख (Riteish Deshmukh) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर त्यांचा थोरला मुलगा अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि धाकटा भाऊ धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) हे दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. रितेशची पत्नी जिनिलिया (Genelia Deshmukh) हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे सर्वांना माहित आहे. पण तुम्हाला माहित्येय का, विलासरावांचा थोरला मुलगा अमित यांची पत्नीदेखील एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होती. चला तर मग जाणून घेऊया विलासराव देशमुख यांच्या मोठ्या सुनेबद्दल.

अमित देशमुख यांनी वयाच्या २१व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे अदिती देशमुख. पूर्वाश्रमीची अदिती प्रताप एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. अदितीचे बालपण बंगळुरू आणि दिल्लीत गेले. अभिनय क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी ती मुंबईत आली. सात फेरे या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला आणि या मालिकेतून ती घराघरात पोहचली. तिने मान या मालिकेतही काम केले. सात वर्षे तिने अभिनय आणि मॉडेलिंग केले. तसेच उर्मिला मातोंडकरसोबत 'बनारस-अ मिस्टिक लव्ह स्टोरी' या चित्रपटातही तिने काम केलंय.

२००८ साली अमित देशमुख आणि अदिती प्रताप यांनी लग्न केले. त्यांना अवीर आणि अवान ही दोन मुले आहेत. जेव्हा अदिती आणि अमित यांचे लग्न झाले तेव्हा विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा अदिती आणि अमित यांचा प्रेमविवाह असल्याचे म्हटले जात होते पण अदितीने हे अरेंज मॅरेज असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

करिअर यशाच्या शिखरावर असताना अदिती देशमुखने अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. कुटुंबाला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. त्यानंतर कधीच ती मालिका किंवा सिनेमात पाहायला मिळाली नाही. आता ती एक गृहिणी आहे, त्याशिवाय तिचा स्वतःचा बिझनेसदेखील आहे. देशमुख कुटुंब सामाजिक उद्योजक आहे. ती '२१ ऑरगॅनिक' या फार्म-टू-टेबल उपक्रमाची संस्थापक आहे. याशिवाय अदिती नमस्कार आयुर्वेदाची सह-संस्थापकसुद्धा आहे. 

टॅग्स :अमित देशमुखरितेश देशमुख