Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीच्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याला झाले १ वर्ष पूर्ण, आठवणींना दिला उजाळा

By तेजल गावडे | Updated: October 10, 2020 17:53 IST

नोरा फतेहीचे 'एक तो कम जिंदगानी' हे गाणे सुपरहिट ठरले होते. आता या गाण्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

नोरा फतेही एक जबरदस्त डान्सर आहे. ती नृत्यासाठी खूप मेहनत घेते आणि ती अभिनयापेक्षा डान्समुळेच जास्त प्रचलित आहे. दिलबर दिलबर, ओ साकी साकी, कमरिया आणि एक तो कम जिंदगानी या गाण्यांवर थिरकून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता तिच्या एक तो कम जिंदगानी या गाण्याला एक वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने आता या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या गाण्याच्या रिहर्सल व्हिडिओसोबत फोटोदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. 

'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता. हे गाणेही प्रचंड हिट ठरले.रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत. त्यापैकी मरजावां सिनेमातील गाणं एक तो कम जिंदगानीदेखील खूप गाजले होते आणि या गाण्याला आता एक वर्षे पूर्ण झाले आहे. अलीकडेच ती 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' रिअॅलिटी शोमध्ये देखील गेली होती. 

बॉलिवूडमध्ये डान्स आणि अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. हे ट्रोलिंग आणि त्या व्हिडीओत आता टेरेंसने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 

बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत टेरेंस यावर बोलला. तो म्हणाला, ‘खरे सांगू पहिल्यांदा मी हा व्हायरल व्हिडीओ बघितला तेव्हा जराही विचलित झालो नव्हतो. हा व्हिडीओ एडिटेड होता, हे पाहताक्षणी लक्षात येते होते. त्यात स्पेशल इफेक्ट्स होते, हेही स्पष्टपणे दिसत होते. आजच्या जगात प्रत्येक सेलिब्रिटीवर मीम्स बनतात. हे सगळे खोडसाळ मीमरचे काम होते. मला अशा ट्रोलिंगने जराही फरक पडत नाही.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसणार आहे. याशिवाय नोराने आतापर्यंत दिलबर, कमरिया, गर्मी, साकी साकी आणि एक तो कम जिंदगानी या गाण्यावर थिरकून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

टॅग्स :नोरा फतेही