Join us
Daily Top 2Weekly Top 5

चक्क बँकॉकच्या रस्त्यावर कपडे विकताना दिसली होती नोरा फतेही, व्हायरल झाला होता व्हिडीओ

By तेजल गावडे | Updated: October 2, 2020 14:21 IST

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नोरा बँकॉकमधील एका लोकल मार्केटमध्ये कपडे विकताना दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अभिनयापेक्षा डान्समुळे जास्त लोकप्रिय आहे. नोराने तिच्या डान्सच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. नोरा डान्स शिवाय बऱ्याचदा तिच्या फोटो व व्हिडीओंमुळे चर्चेत येत असते. नोरा सध्या कोरिओग्राफर टेरेंस लुईससोबतच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. मात्र व्हिडिओमुळे चर्चेत येण्याची तिची पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील तिचे व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात नोरा कपडे विकताना दिसत होती. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नोरा बँकॉकमधील एका लोकल मार्केटमध्ये कपडे विकत असल्याचे म्हटले जात होते. तिच्या आजूबाजूला कपड्यांचे ढिगही दिसत होता. तिने एक पॅन्ट हातात घेऊन सातशे, आठशे दोनशेमध्ये कपडे घ्या असे बोलताना ती दिसली होती.

विशेष म्हणजे ती अगदी आनंदात कपडे विकताना दिसत होती.  हे कमी की काय ती ग्राहकासोबत भावही करताना दिसली होती. पण नोरा खरंच बँकॉकच्या बाजारात कपडे विकत नव्हती तर ती फक्त मित्र- मैत्रिणींसोबत मस्ती करत होती. नोराचं हे वेगळं रूप पाहून तिचे काही चाहते हैराण झाले होते तर काहींना हा व्हिडिओ आवडलाही होता. 

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल

नोरा ही एक कॅनेडियन डान्सर आणि मॉडेल आहे. तिने हिंदी सिनेमांशिवाय अनेक तेलगु आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने आतापर्यंत तिची 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगी' आणि 'गर्मी सॉन्ग' ही गाणी फारच गाजली. अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात. सिनेमात काम करण्याबाबत सांगायचं तर नोरा अजय देवगनसोबत 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे.

नोराला केलं ट्रोल

अभिनेत्री नोरा फतेही आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा एक व्हिडीओ  काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय. केवळ व्हायरल नाही तर या व्हिडीओ पाहून नेटकरी टेरेंसला ट्रोल करत आहेत. या व्हिडीओत कथितरित्या टेरेंस नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसतो. आता या वादग्रस्त व्हिडीओवर टेरेंस आणि नोराची प्रतिक्रिया आली आहे. टेरेंसने यावर थेटपणे बोलणे टाळले़ पण नोरासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो त्याने शेअर केला. सोबत एक कथाही ऐकवली, यावर नोरानेही कमेंट केली आहे.

टॅग्स :नोरा फतेही