Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमूरच्या चाहत्यांसाठी आहे ही वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:24 IST

सैफ अली खान आणि करिनाच्या चिमुकल्या तैमुरचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सैफच्या घरासमोर तसेच तैमुरच्या शाळेसमोर नेहमीच उभे असतात. तैमुरची एक झलक तरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. पण तैमुरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याची छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रियतेत जराही कमी आलेली नाही. करिना आणि सैफ देखील आपल्या या लाडक्या मुलाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना सैफचे आणि करिनाचे चाहते भरभरून प्रतिसाद देतात. पण तैमुरच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी आहे. तैमुरला मीडियापासून दूर ठेवण्याचा सैफ अली खानने निर्णय घेतला आहे.

सैफ अली खान आणि करिनाच्या चिमुकल्या तैमुरचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सैफच्या घरासमोर तसेच तैमुरच्या शाळेसमोर नेहमीच उभे असतात. तैमुरची एक झलक तरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. पण यामुळे तैमुर खूपच कमी वयात प्रकाशझोतात आला आहे. या सगळ्यामुळे त्याचे बालपण हरवत असल्याचे सैफचे म्हणणे आहे आणि त्यामुळे सैफने प्रसारमाध्यमांना आणि त्याच्या चाहत्यांना तैमुरचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. सैफने त्याच्या या निर्णयाबाबत अद्याप प्रसारमाध्यमांना सांगितले नसले तरी सैफच्या एका जवळच्या व्यक्तीने याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली असल्याचे कळतेय.

तैमुर जिथे जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याची झलक टिपण्यासाठी उपस्थित असतात. या सगळ्याची तैमुरला देखील सवय झाली आहे. या सगळ्यामुळे तैमुरला इतर सामान्य मुलांसारखे जगता येत नाही. त्याचे आता खेळण्याचे बागडण्याचे वय असल्याने तैमुरला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचे सैफने ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. 

तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. करीना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर खूप लहान असला तरी खूप लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो.

टॅग्स :तैमुरसैफ अली खान करिना कपूर