Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निर्वाणी भीमराया" गाण्याद्वारे गायिका कविता राम यांचं महामानवाला अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:12 IST

आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते.

Mahaparinirvan Din 2024 : 6 डिसेंबर रोजी 'महापरिनिर्वाण दिन' साजरा केला जातो.  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68 वी पुण्यतिथी.  हा एक महत्त्वाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, त्यांचे आपल्यावर असलेले उपकार, त्यांनी आपल्याला दिलेले संदेश यांची आठवण करून देणारी असंख्य भीमगीते आपण ऐकत आलो आहोत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून एका वेगळ्या धाटणीच्या गाण्याद्वारे कविता राम यांनी अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

"निर्वाणी भीमराया" हे गाणे कविता राम यांनी कौस्तुभ दिवाण यांनी लिहलं आहे. तर प्रफुल - स्वप्नील यांनी संगीत दिलंय. तर कविता राम यांनी आपल्या मधूर आवाजात हे गाणं गायलं आहे. सौरभ काजरेकर यांनी ध्वनीमुद्रण केलं आहे.  "६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अखेरचा श्वास घेतला. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला. त्यांच्या योगदानाची आठवण करून, निर्वाणी भीमराया या गाण्याद्वारे कोटी कोटी अभिवादन", या शब्दात कविता राम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारत तसेच जगभरातील व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. 6 डिसेंबर 1956 रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात. त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरसेलिब्रिटी