Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीना कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर शेअर केला ‘AB आणि CD’ मधील सरप्राईज एण्ट्रीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 10:51 IST

‘AB आणि CD’ चे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

‘नीना कुलकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुलकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्री या नात्याने ते प्रेक्षकवर्गापर्यंत पोहचल्या जरुर पण आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक सरप्राईज प्रेक्षकांना दिले आहे.

नीना कुलकर्णी  यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत हे सर्वांना माहित आहे, पण नीना कुलकर्णी  पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत हे अनेकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल. पण त्या कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्रीच्या मागे नेमके कारण काय? याची उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहेत.

 ‘AB आणि CD’ चे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता प्रतिक्षा केवळ या सिनेमाची झलक पाहण्याची असणार हे मात्र नक्की.

टॅग्स :विक्रम गोखलेअमिताभ बच्चन