Join us
Daily Top 2Weekly Top 5

पैशांची गरज होती म्हणून अशा सिनेमात केले होते काम, इतक्या वर्षानंतर नीना गुप्ता यांनी सांगितले खरे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:47 IST

इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच नीना गुप्ता यांनी सांगितले की,रसिकांना मनोरंजन करत असतात अशा कलाकारांनाच निर्माते त्यांच्या सिनेमात संधी देत असतात. त्यामुळे जास्त सेलिक्टीव्ह राहणेही कलाकाराला परवडणारे नसते.

'बधाई हो', 'मुल्क' आणि 'वीरे दी वेडिंग' सारख्या सुपरहिट सिनेमात अभिनेत्री नीना गुप्ता यांनी रसिकांचे मनोरंजन केले. वयाच्या ६० वर्षीय नीना गुप्ता फिल्मी करिअरपेक्षा खासगी कारणांमुळेच जास्त चर्चेत असतात. नीना गुप्ता नेहमीच बेधडक आणि बिनधास्त विचार मतं मांडताना दिसतात. पुन्हा एकदा नीना चर्चेत आल्या आहेत. यावेळीही स्वतःत्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरवरबाबत आपले मत मांडले आहे. पूर्वी 'ड' दर्जाचे सिनेमा केल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. अनेकदा पैशांसाठी अशा सिनेमात काम करावे लागल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सिनेमाचे शूट पूर्ण झाले की, सिनेमा प्रदर्शित होवूच नये अशी प्रार्थनाही करायचे. अनेकदा कलाकारांना पैशांसाठी अशी काही कामं करावं लागतात जे त्यांना ते कधीच आवडलेले नसते. प्रत्येकाला कामाच्या बाबतीत सिलेक्टीव्ह राहणे शक्य नाही. इंडस्ट्रीत टिकून राहायचे असेल दोन पैसे कमवायचे असेल तर मिळालेल्या संधीचे सोनं करायचे हाच एक पर्यांय असतो. 

बधाई हो सिनेमा ख-या अर्थाने माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. हा सिनेमा मिळाला नसतात तर माझ्या करिअरला नवीन वाट मिळालीच नसती, 'बधाई हो सिनेमात काम करण्याची संधी मिळणे योगायोग होता. जर इतर कोणत्या अभिनेत्रीने हा सिनेमा केला असता तर मी जिथे होते तिथेच राहिले असते.  असेही नीना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

'बधाई हो' नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. पण जर हा सिनमा रसिकांना आवडला नसता तर मला या भूमिकाही मिळाल्या नसत्या. हा एक व्यवसाय आहे. जे सतत रसिकांना मनोरंजन करत असतात अशा कलाकारांनाच निर्माते त्यांच्या सिनेमात संधी देत असतात. त्यामुळे  जास्त सेलिक्टीव्ह राहणेही कलाकाराला परवडणारे नसते. या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर काम करत राहणे हाच एक पर्याय.

 'बधाई हो'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नीना यांना फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कार मिळाला होता. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीही नामांकन देण्यात आले होते. 2020 मध्ये त्या कंगना रनौतचा 'पंगा' आणि आयुष्मान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्येही त्या झळकल्या आहेत. 

टॅग्स :नीना गुप्ताबधाई हो