Join us

निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:22 IST

. प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. निकची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने मंगळवारी तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला. प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंकाच्या वाढदिवशी ज्या पोस्टची चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असते ती म्हणजे पती निक जोनास. प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर केली आहे.  निकची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

निकने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही एका बोटीवर रोमाँटिक अंदाजात बसलेले दिसतायेत. फोटो शेअर करताना निकने लिहिले- 'मला तुला सेलिब्रेट करायला आवडते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रेमा. निकने प्रियंकासाठी पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला.अनेकांनी प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रियांकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रियांका केक कापताना दिसत आहे, व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा जंपसूट घातला आहे. 

अलिकडेच प्रियंकाने पती निकसोबतचा (Nick Jonas) एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता. प्रियंका आणि निक विम्बल्डन बघण्यासाठी गेले होते. प्रियंकाने यावेळी गडद हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला होता. तिने पोनीटेल हेअरस्टाईल केली होती. तर निक जोनास व्हाईट शर्ट, चेक्स सूटमध्ये दिसला. विम्बलडनवरुन परतत असताना कारमध्ये प्रियंकाने व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये निक प्रियंकाची पोनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला ती काही करुन काढताच येत नाही. निकचा हा प्रामाणिक प्रयत्न पाहून प्रियंकालाही हसू येतं. तिने हसत हसतच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तर'पोनी टेलची गुंतागुंत' असं कॅप्शनही दिलं आहे.

दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका चोप्रा शेवटची सिटाडेलमध्ये दिसली होती. ती लवकरच जॉन सीनासोबत दिसणार आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका शेवटची 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती. प्रियंका आलिया भट आणि कतरिना कैफसोबत जी ले जरा या चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा काही काळापूर्वी झाली होती. मात्र, रिपोर्टनुसार प्रियंकाने आता चित्रपटासाठी नकार दिला आहे. फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास